• Home
  • 🛑 **कोरोना लढ्यासाठी…! राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा निर्णय* 🛑 ✍️ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 **कोरोना लढ्यासाठी…! राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा निर्णय* 🛑 ✍️ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 **कोरोना लढ्यासाठी…! राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा निर्णय* 🛑
✍️ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे :⭕ सध्या राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, रुग्णांना बरे करण्यासाठी वेगवेगळे उपचार केले जात आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

आता दोन महिन्यांनी त्यांनी परत एकदा आपली रक्त चाचणी केली. रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

त्यांनी कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रभावी ठरणाऱ्या प्लाझ्मा दान (Donate Plasma) करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

“मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.

येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली…⭕

anews Banner

Leave A Comment