Home मुंबई काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन 🛑

काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन 🛑

106
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत.

एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. आज सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राजकीय कारकीर्द एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता.
जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते.

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसकडून दोनवेळा संसदेवर निवडून गेले होते. ते १४ व्या आणि १५ व्या लोकसभेचे खासदार होते. गायकवाड यांनी मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
२०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पराभूत केले होते.

गायकवाड हे धारावी मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून गेले होते. तर दोनवेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले होते.⭕

Previous article🛑 महाराष्ट्राच्या लॉकडाउन सारख्या निर्बंधांना १५ मे पर्यंत वाढविण्यात येईल – आरोग्यमंत्री राजेश टोपे 🛑
Next articleझेप प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा नोंदणी शिबिराचे आयोजन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here