राजेंद्र पाटील राऊत
🛑 झेप प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा नोंदणी शिबिराचे आयोजन 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
ठाणे:-⭕१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील सर्व व्यक्तींना कोरोना पासून बचाव करण्यासाठी सरकार तर्फे लसीकरण मोहीम आखण्यात आलेली आहे.
पर्यंत लसीकरण केल्या नंतर किमान २८ दिवस तरी रक्तदान करता येणार नाही. यादरम्यान राज्यात रक्ताची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असून अपघातग्रस्त, थैलसेमिया आणि गरोदर पेशंट साठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या झेप प्रतिष्ठान संस्थेनं रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा दान नोंदणी शिबिर आयोजित केले आहे.
या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष-श्री विकास धनवडे यांनी केले आहे.⭕




