• Home
  • *आज अखेर वडगांव कोविड सेंटरमधून ६८ कोरोना रूग्णांना* *डिस्चार्ज*

*आज अखेर वडगांव कोविड सेंटरमधून ६८ कोरोना रूग्णांना* *डिस्चार्ज*

*आज अखेर वडगांव कोविड सेंटरमधून ६८ कोरोना रूग्णांना* *डिस्चार्ज*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

 

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील वडगांव (धन्वंतरी ) कोविड सेंटरमधून आज अखेर ६८ कोरोना रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले .
वडगांव कोविड सेंटर सुरू करून 1 आज एक महिना पूर्ण झाला आज अखेर कोविड सेंटरमध्ये 73 रुग्ण ऍडमिट करून घेतली त्यापैकी 64 रूग्णांना डिस्चार्ज दिला.
आज दिनांक १०/१०/२०२० रोजी वडगांव कोविड सेंटरमधून वय वर्षे ७९वयोवृद्ध असलेले कोरोना रूग्ण पूर्णपणे ठणठणीत बरे करून घरी पाठवणेत आले.
तसेच या कोविड सेंटरला वडगांव नगरीतील दानशुर व्यक्ती , संस्था , सामाजिक संघटना , व्यापारी असोसिएशन या सर्वांच्या अनमोल सहकार्याने वडगांव कोविड सेंटर सुर करण्यात आले .तसेच या कोविड सेंटरमधे पूर्णपणे मोफत सेवा दिली जाते .
तसेच वडगांव कोविड सेंटरमध्ये अहोरात्र काम करणारे डॉक्टर, नर्सेस, तसेच वडगांव नगरपरिषदे चे आरोग्य अधिकारी, कर्मचारी व वॉर्डबॉय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.
तसेच वडगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे ) यांचेही मोलाचे सहाकार्य लाभले आहे.
तसेच वडगांव कोविड सेंटर
नगरपालिका अभियंते स्वप्नील राणगे, अमीन तांबोळी,
वैद्यकीय अधिकारी -डॉ. एम. एम. पटवेकर, डॉ. ऋषिकेश चौगुले, डॉ.सुप्रिया खडे, डॉ. स्वप्नील दिक्षित,
नर्सिंग स्टाफ – अंकिता हावल, देविका गोसावी, पूनम कांबळे, तेजस्विनी कांबळे, शैनज पठाण, सुषमा कांबळे, अश्विनी देसाई, आरती कांबळे, ज्योती गायकवाड.
फार्मासिस्ट – काजल कांबळे, स्वप्नील खडे
वॉर्डबॉय – कुमार सनदी, विनायक सातपुते, अभिषेक कांबळे, राहुल कांबळे, सूरज चौगुले, आकाश खबडे
ऑफिस स्टाफ – सुर्याजी भोपळे , नंदू पोळ, संतोष वारींगे , मोहन पाटील , अक्षय मुंदाळे , ओंकार मुंदाळे , संतोष गुरव , आशिष रोटे यांचेही वडगांव कोविड सेंटरला मोलाचे सहकार्य लाभले.

anews Banner

Leave A Comment