• Home
  • *अखिल भारतीय मराठा महासंघाचे* *राष्ट्रीय सरचिटणीस* *यांचा किणी येथे सत्कार*

*अखिल भारतीय मराठा महासंघाचे* *राष्ट्रीय सरचिटणीस* *यांचा किणी येथे सत्कार*

*अखिल भारतीय मराठा महासंघाचे* *राष्ट्रीय सरचिटणीस* *यांचा किणी येथे सत्कार*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री राजेंद्र कोंढारे साहेब यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेसाठी आले आसता त्यांचे किणी गावामधे सकल मराठा समाज व मराठा महासंघ पदाधिकारी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करून त्यांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठा
महासंघाचे सरचिटणिस श्री राजेंद्र कोंढारे साहेब म्हणाले मराठा समाजाचे तज्ञ मार्गदर्शक यांच्या सोबत प्रशिक्षण शिबिर घेऊन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी सारख्या योजना यांची माहिती देण्याचे आश्वासन दिले व मराठा आरक्षण लढ्याला सर्व मराठा समाज एकत्रित येऊन बळ देण्याची गरज व्यक्त केली. तसेच मराठा महासंघ व सकल मराठा समाज यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील सर्व गावामधे सुरू असलेल्या “मराठा जागृती मोहिमेचे” श्री.कोंडारे यांनी कौतुक केले.
किणी येथील श्री लक्ष्मी सरस्वती महीला पत संस्थेच्या हॉल मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुहास माने , रमेश पालकर , मच्छिंद्र पाटील , प्रविण खोपकर , अँड.अक्षय भोसले , विजयसिंह शिंदे , गोरख शिंदे , आसमान मोहीते , हंबिरराव पाटील , धिरज चव्हाण , भिमराव पाटील , संताजी माने , रमेश पाटील , डाँ.सुभाष माने , नरेंद्र घाटगे , पोपट शिंदे , संतोष जाधव ,अमित घोटवडे , साप्ताहिक युवा मराठाचे कार्यकारी संपादक मोहन शिंदे इत्यादी मराठा बांधव उपस्थित होते .

anews Banner

Leave A Comment