• Home
  • पुणे_पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता

पुणे_पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता

पुणे 11 ऑक्टोंबर⭕( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕

पुणे_पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता शुक्रवारी ( दिं ९ ) पारपडली .
शर्मिला बाबर सुरेश भोईर राजेंद्र लांडगे सागर आंघोळकर विकास डोळस बाबा त्रिभुवन हर्षल ढोरे कुंदन गायकवाड
यांची बिनविरोध
प्रभाग अध्यक्ष पदी निवड झाली.
भाजपकडून अ` प्रभाग अध्यक्ष पदी शर्मिला बाबर यांची पुन्हा वर्णी लागली.
ब`प्रभाग सुरेश भोईर क’ प्रभाग राजेंद्र लांडगे
ड’ प्रभाग सागर आंगोळकर इ’ प्रभाग विकास डोळस ग’ प्रभाग अध्यक्षपदासाठी बाबा त्रिभुवन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
ह’ प्रभाग हर्षल ढोरे फ’ प्रभागाच्या अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांची निवड करण्यात आली.
निवडीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवना मधील मधुकर पवळे सभाग्रहात. प्रभागाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभाग आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून. अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
प्रत्येक प्रभाग समिती सभापती च्या पदाचा निवडीवेळी सभा शाखा सचिव म्हणून त्या त्या प्रभागाच्या प्र शासन अधिकाऱ्यांनी काम पाहिले.
यामध्ये
अ-ब-क-ड-इ-फ-ग आणि ह प्रभागाचे अधिकारी अनुक्रमे
सुचिता पानसरे सोनम देशमुख दिलीप आढारी कैलास गावडे अवधुत तावडे वामन नेमाने श्रीनिवास दांगट आणि श्रीकांत कोळप यांचा समावेश होता.
निवडीवेळी सभागृहात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यासह नगर सचिव उल्हास जगताप
क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर प्रशांत जोशी अण्णा बोदडे कैलास गावडे बाळासाहेब खांडेकर मनोज लोणकर स्मिता झगडे आणि संदीप खोत उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment