Home Breaking News *पत्रकार भवनच्या मुद्द्यावरुन पत्रकारांविरोधी राजकारण्यांचा दबावतंत्राचा सामना रंगतोय*

*पत्रकार भवनच्या मुद्द्यावरुन पत्रकारांविरोधी राजकारण्यांचा दबावतंत्राचा सामना रंगतोय*

99
0

*पत्रकार भवनच्या मुद्द्यावरुन पत्रकारांविरोधी राजकारण्यांचा दबावतंत्राचा सामना रंगतोय*
*अप्रत्यक्ष दबाव,दडपण,धमक्यांना सुरुवात*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या पत्रकार भवनच्या मुद्द्यावरुन नाशिक जिल्ह्यातल्या कौळाणे (निं.) आणि व-हाणे येथील जागेबाबत पत्रकारांविरोधी राजकारण्यांचा दबावतंत्राचा सामना रंगतोय.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार व-हाणे गांवी पत्रकार निवासस्थानासाठी दिनांक १० जुलै २०२० रोजी रितसर जागा मागणीचा अर्ज शासनाचे परिपत्रक देऊनही तेथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी मुद्दामच पत्रकारांची अडवणूक करण्यासाठी जिल्हाधिका-यांचे पत्र आणा,वगैरे कारणे सांगून वेठीस धरुन ग्रामपंचायत कार्यकारीणी बरखास्त होताच आणि प्रशासक नियुक्त होताच घुमजाव केले,सदरचा प्रश्न माझ्या अधिकारात नाही सारखी उतरे देऊन टाळाटाळ सुरु केली.त्यानंतरही मालेगांवचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी ग्रामसेविका श्रीमती सांळुखे यांना पत्र देऊन तातडीने या पत्रकार निवासस्थान प्रश्नी कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याबाबत कळवूनही आजपर्यंत सदरच्या ग्रामसेविका सांळुखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राला महत्त्व आणि किंमत दिलेली नाही.याचाच अर्थ हम करे सो कायदा अशीच अनुभूती या प्रकरणातून येत आहे.तर व-हाणे गांवी पत्रकार निवासस्थानासाठी सांगितलेली जागा हि स्वतः ग्रामसेविका श्रीमती सांळुखे यांनी दाखविल्यावरच तेथे ग्रामसेविका तत्कालीन सरपंच यांच्या हस्ते सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेले आहे,असे असतांना आता त्या पत्रकार निवासस्थानाच्या जागेला दस्तुरखुद्द ग्रामसेविका यांनीच विरोध करावा म्हणजे या प्रकाराला नेमके काय म्हणायचे?कालपर्यत पत्रकार निवासस्थानाला जागा देण्याचे मान्य करणाऱ्या ग्रामसेविका मँडम नेमके कुणाच्या दबावाखाली पत्रकारांवर अन्याय करीत आहेत? याचाही खरे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध आणि बोध घेणे गरजेचे आहे.वास्तविक सदर जागेबाबत पत्रकार आणि शासन असा वाद सुरु असताना मात्र तथाकथित राजकारणी आता युवा मराठा न्युजच्या मुख्य संपादकावर दबाव,दडपण आणून अप्रत्यक्षरित्या धमक्या देण्याचे तंत्र अवलंबत आहेत.तसेच कौळाणे (निं) येथील पत्रकार भवनच्या जागेबाबतही कागदपत्रात अफरातफर करुन ठेवणारे पडद्यामागून युवा मराठा न्युजचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे आता या पत्रकार निवासस्थानाच्या जागा प्रश्नी पत्रकार विरुध्द तथाकथित राजकारणी दबावतंत्राचा सामना रंगतोय.मात्र लवकरच युवा मराठा न्युजच्या वतीने दबाव,दडपण आणून धमक्या देणाऱ्या तथाकथित राजकारण्याची नावे पोलिसात देऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली जाणार आहे.

Previous article*एम.पी.एस.सी.परीक्षा रद्द झाल्याने* *कोल्हापूरात मराठा समाजाच्याने* *वतीने स्वागत*
Next articleपुणे_पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here