• Home
  • *भाजी विक्रेत्याची नगरपालिका* *कर्मचाऱ्यांना दादागिरी.*

*भाजी विक्रेत्याची नगरपालिका* *कर्मचाऱ्यांना दादागिरी.*

*भाजी विक्रेत्याची नगरपालिका* *कर्मचाऱ्यांना दादागिरी.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

हातकणंगले तालुक्यातील पेटवडगांव शहरामध्ये वडगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांना एका भाजी विक्रेत्यांनी दादागिरी केली सदर घटना आज वडगांव शहरात घडली.
सध्या वडगांव मध्ये कोरणा रुग्णांची संख्या वाढतच चालली असून खबरदारी म्हणून गर्दी टाळता यावी म्हणून भाजी विक्रेत्यांना भाजीपाला फिरून विकण्यासाठी विनंती केली आहे .काही भाजीविक्रेते एका जागी बसून भाजी विकत आहेत व त्या ठिकाणी गर्दी होत आहे. कोणतीही सुरक्षितता नाही,सँनीटायझर नाही, तोंडावर मास्क नाही .
सुरक्षेच्या दृष्टिने भाजी फिरून विकण्याची मुभा दिली आहे असे असतानाही गोरख तुकाराम पोळ आणि त्यांच्या पत्नी व पुतण्या यांना विनंती केली असता त्यांनी नगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना अरेरावी करून दादागिरीची भाषा केली .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगांव शहरांमध्ये पालिकेचे सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, मुख्याधिकारी कोल्हे मँडम , आणि पोलिस प्रशासन हे सर्व गेली चार-पाच महिने महिने नागरिकांच्या हितासाठी रात्रंदिवस झगडत आहेत. अशा कोरणा योद्ध्यांना सहकार्य करण्या ऐवजी अरेरावीची भाषा करणे दादागीरी करणे ही निंदनीय बाब आहे. या भाजी विक्रेत्यांवर वर कठोर कारवाई ह्वावी अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे.
सदर घटणेबाबत ठिकठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.

anews Banner

Leave A Comment