आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून जोरदार पाऊस -पंजाबराव डख
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
परभणी:-जिल्हात मागील 15 दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. मात्र सोमवार २९ ऑगस्टपासून राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. २९ ऑगस्टपासून सुरु होणार पाऊस १२ सप्टेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात असेल अशा अंदाज डख यांनी समाज माध्यमांवर सार्वजनिक केला.
पंजाबराव डख यांचा अंदाज अचूक ठरत असल्याने त्यांच्या अंदाजाकडे
शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






