Home गडचिरोली आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार

161

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0054.jpg

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

पंचायत समिती गडचिरोली च्या वतीने हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गडचिरोली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सर्व सत्कारमूर्ती सरपंच व ग्रामसेवकांचे अभिनंदन

जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गडचिरोली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांच्या सत्काराचा समारंभ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडला यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतरावजी ईचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी श्री साळवेजी, भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य रामरतनजी गोहने, मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत क्षेत्रामध्ये हर घर तिरंगा या अभियानाचे उत्तम असे नियोजन व यशस्वी आयोजन करून ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी या तालुक्याची मान उंचावली आहे. त या यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या सत्कार मूर्ती सर्व सरपंच व सचिवांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. सोबतच या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांचेही अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Previous articleशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून जोरदार पाऊस -पंजाबराव डख
Next articleकिसान एकता संघाच्या विविध पदाधिका-यांची बुलढाणा जिल्ह्यात निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.