Home बुलढाणा EKYC:साठी सीएससी व सेतु चालकांन कडून शेतकऱ्यांची लूट ! सोसावा लागतोय नाहक...

EKYC:साठी सीएससी व सेतु चालकांन कडून शेतकऱ्यांची लूट ! सोसावा लागतोय नाहक भूर्दंड, EKYCसाठी घेतली जातेय ‘एवढी’ रक्कम

83
0

आशाताई बच्छाव

IMG_20231117_054647.jpg

EKYC:साठी सीएससी व सेतु चालकांन कडून शेतकऱ्यांची लूट ! सोसावा लागतोय नाहक भूर्दंड, EKYCसाठी घेतली जातेय ‘एवढी’ रक्कम

स्वप्निल देशमुख ब्यूरो चीफ बुलढाणा
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता सीएससी व सेतु चालक हे शेतकऱ्यांन कडून ‘ई केवायसी’ साठी प्रत्येकी 100 रुपये शुल्क घेण्यात येत असल्याचा प्रकार युवा मराठा ब्यूरो टीम यांच्या निदर्शनास आला.
संबंधित सेतू व csc सेंटर चालकांकडून शेतकऱ्यांची मनमानी लूट व पिळवणूक चालू आहे याकडे वरिष्ठांचे स्वार्थापोटी दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. येथे कारण म्हणजे मुळातच संग्रामपूर तालुक्यातील बऱ्याच विभागातील काही वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कर्मचारी सुद्धा मुख्यालयीन राहत नसल्यामुळे त्यांचे या तालुक्याकडे साथ दुर्लक्ष आहे म्हणजेच एका प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाव देणे असेच काहीसे या मुख्यालयीन न राहणाऱ्यांकडून दिसून येते, विशेष म्हणजे तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तहसीलदार हे स्वतःच संग्रामपूर येथे मुख्यालय न राहता जळगाव जामोद येथून अपडाऊन करतात वास्तविक पाहता शासनाने लाखो रुपये खर्चून त्यांच्या करता सुसज्ज असं निवासस्थान बनवलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या कडे साप महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते वरील सर्व चालू असलेली मनमानीही थांबवण्याकरता विद्यमान उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी वेळीच लक्ष दिल्यास सामान नागरिकांना होणारा त्रास व शेतकऱ्यांची पिळवणूक ही थांबेल. कारण संग्रामपूरचे तहसीलदार साहेब मुख्यालयीन राहत नाहीत म्हणून त्यांना आपले सरकार ग्राहक केंद्राकडून शेतू csc सेंटर कडून नागरिकांची चालू असलेली पिळवणूक बद्दल त्यांना माहिती नसते असे म्हणणे काही भव्य ठरणार नाही. तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी साहेब यांनी तात्काळ तहसीलदार यांना योग्य समज द्यावा व होणारी शेतकऱ्याची पिळवणूक त्वरित थांबावी..

Previous articleमा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाच्या मार्गावर
Next articleअखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here