Home बुलढाणा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन

अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन

107
0

आशाताई बच्छाव

IMG_20231117_055039.jpg

अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन
स्वप्निल देशमुख
संग्रामपूर :- तालुक्यातील विराट हनुमान संस्थान पंचाळा येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरी किर्तन आयोजन केलेले आहे आरंभ शुक्रवार:दिनांक 17/11/2023 रोजी केलेले आहे. ज्ञानेश्वरी पारायण ह. भ .प .श्री निलेश महाराज झांबरे यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताह दरम्यान हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये ह. भ. प. विष्णु महाराज सखारामपुरकर, ह .भ. प. अभिषेक महाराज पवार शेगाव, ह भ. प .भिकाजी महाराज मिरगे माटरगाव, ह. भ. प. रामभाऊ महाराज उन्हाळे शेगाव, ह. भ. प. गुरुवर्य सारंगधर महाराज गोळेगाव, ह .भ .प .ज्ञानेश्वर महाराज वाघ गणेश आश्रम वारी हनुमान, ह .भ. प .शिवाजी महाराज मानकर आळंदीकर, तर ह .भ .प .निलेश महाराज झामरे सखारामपूरकर यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे. यादरम्यान धामणगाव ,पळशी, झाशी, उमरा, टूनकी, बावनबीर, व पंचक्रोशीतील समस्त टाळकरी मंडळींचे सहकार्य लाभणार आहे
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ हरी किर्तन होणार आहे, या दरम्यान अन्नदात्यांकडून संत भोजन पारायण सप्ताह दरम्यान आयोजित केले आहे
कार्यक्रमाची सांगता दिंडी सोहळ्याने होत असून दिंडी सोहळा शुक्रवार दिनांक 24 11 2023 ला होणार असून महाप्रसादाचे आयोजन केले आहे
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विराट हनुमान संस्थान पंचाळा तसेच समस्त गावकरी मंडळी पंचाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे

Previous articleEKYC:साठी सीएससी व सेतु चालकांन कडून शेतकऱ्यांची लूट ! सोसावा लागतोय नाहक भूर्दंड, EKYCसाठी घेतली जातेय ‘एवढी’ रक्कम
Next articleव-हाणेतील त्या गावगुंडांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी चांदवड ला निवेदन दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here