Home गडचिरोली चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या कामाला लवकरच बांधकामाला होणार सुरुवात आमदार डॉक्टर देवरावजी होळी

चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या कामाला लवकरच बांधकामाला होणार सुरुवात आमदार डॉक्टर देवरावजी होळी

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0025.jpg

चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या कामाला लवकरच बांधकामाला होणार सुरुवात

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये चामोर्शी क्रीडांगणाच्या सफाई कामाला सुरुवात

क्रीडांगणाच्या परिसराची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी

मागील अनेक वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडांगणाच्या परिसराच्या स्वच्छतेच्या, साफसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तालुका क्रिडा अधिकारी भटकलवारजी , मोजनी अधिकारी ठाकरेजी, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शाहा , तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे,प्रतीक राठी,विजयजी गेडाम,राकेश खेवले ,राकेश बेलसरे,पुरुषोत्तम बोरकूटे, तारक हलदार,पोषक गेडाम, यांचे सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक प्रामुख्यानं उपस्थित होते.

चामोर्शी तालुक्याच्या क्रीडांगणासाठी सातत्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी प्रयत्नरत असून या कामाला प्रथम प्राधान्याने कशी सुरुवात करता येईल यासाठी ते काम करीत आहेत. यासंबंधित विभागाचे अधिकारी यांच्या वारंवार बैठका घेवून त्याबाबत संपर्कात आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारकडून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीसाठी त्यांनी विविध मंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. आपल्या प्रयत्नातून लवकरच यासाठी लागणारा निधी उपलब्ध होणार असून लवकरच या क्रीडांगणाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती या परिसराची पाहणी करताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली.

Previous articleजे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा…
Next articleनांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची कार्यकारणी निवड.       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here