Home Breaking News महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येवून मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी...

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येवून मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी संसदेत आवाज उचलावा यासाठी काल दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली मधील नवीन महाराष्ट्र सदन येथे उपस्थित

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_184143.jpg

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येवून मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी संसदेत आवाज उचलावा यासाठी काल दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली मधील नवीन महाराष्ट्र सदन येथे उपस्थित
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

 

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येवून मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी संसदेत आवाज उचलावा यासाठी काल दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली मधील नवीन महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला सर्वपक्षीय २३ खासदारांची उपस्थिती होती.

मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मिळावे यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे. २०१६ मध्ये तब्बल ५८ मोर्चे मराठा समाजाने काढले होते, त्या पूर्वी देखील मराठा समाजाने अनेक मोठी आंदोलने केली होती. मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभर अनेक दौरे व आंदोलने केली होती. मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेवून २ वेळा महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर केले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. आता पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना या मध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी मी स्वतः राज्य मागासवर्ग आयोग तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशातील अनेक कायदेतज्ञ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here