Home नांदेड नांदेड गुरूद्वारा बोर्ड व सिख समाज्याच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी...

नांदेड गुरूद्वारा बोर्ड व सिख समाज्याच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हान व आ.मोहनराव हंबर्डे यांनी सरकारला धारेवर धरले

38
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_092702.jpg

नांदेड गुरूद्वारा बोर्ड व सिख समाज्याच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हान व आ.मोहनराव हंबर्डे यांनी सरकारला धारेवर धरले

नांदेड प्रतिनिधी अंबादास पाटील पवार
नांदेड दक्षिण मतदार संघातील आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या लक्षवेधीच्या माध्मातुन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान व मोहनराव हंबर्डे यांनी सरकारला धारेवर धरून15 दिवसाच्या आत नांदेड गुरूद्वारा बोर्ड व सिख समाज्याच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन घेतले.

नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सदर “सचखंड हूजुर साहेब” गुरूद्वारा बोर्ड, यांच्या लोकशाही मार्गाने निवडणुका घेणे,तसेच लोकनियुक्त अध्यक्ष निवडणे,या सह सन 1956 चे कलम 11 मध्ये फडणवीस सरकारने केलेले संवशोधन तातडीने रद्द करून गुरूद्वारा बोर्ड कलम 11 पूर्वी प्रमाणे अभाधित ठेवणे, भविष्काळात सरकारला काही सुधारणा कराव्या असे वाटल्यास, गुरूद्वारा पंचप्यारे स्थानिक सिख बांधव यांना विश्वासात घेऊन च त्यांच्या मागणप्रमाणे गुरूद्वारा बोर्ड यात सुधारणा कराव्या या प्रमुख मागण्या सह नांदेड येथील स्थानिक सिख समाज्याच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सदर विषयाची विधान सभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती, चौकट
आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या गुरूद्वारा विषयाच्या लक्षवेधी सूचनेवर विधान सभेत उत्तर देतान, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार हंबर्डे यांच्या मागण्या मान्य करून ,नांदेड येथील स्थानिक सिख समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन , व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लवकरच नांदेड गुरूद्वारा बोर्ड निवडणूक लोकशाही मार्गाने घेणे, व कलम 11 मध्ये दुरुस्ती करणे यासाठी आवश्यक उपाययोजना 15 दिवसात किंव्हा 1 महिन्याच्या आत सरकार करणार असे आश्वासन दिले.
आमदार मोहनराव हंबर्डे यांनी संपूर्ण सिख समाज्याच्या अनेक वर्षापासून प्रलंबित व अत्यंत जिव्हाळ्याच्या “नांदेड गुरूद्वारा बोर्ड” विषयावर शासनाला धारेवर धरून निर्णय घेण्यास भाग पाडले तसेच माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या विषयावर बोलतांना नांदेड येथील सचखंड गुरूद्वारा येथील महत्व पटून देताना व सदर गुरूद्वारा आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या मतदार संघात येत असल्यामुळे शासनाने त्यांच्या भावना लक्षात घेऊन व खऱ्या अर्थाने सिख समाजाला न्याय देण्यासाठी तात्काळ भूमिका जाहीर करावी अशी आक्रमक भूमिका आपल्या भाषणात मांडली
विधान सभेत विषय मांडल्या मुळे संपूर्ण सिख समाज व नांदेड परिसरातील स्थानिक समाज बांधव यांच्या कडून आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांचे अनेकांनी आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here