Home नाशिक व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित

व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220922-WA0028.jpg

व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित
____________________ मालेगांव,- व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार भवनच्या जागेच्या प्रश्नासह गावातील दलित आदिवासी वस्ती सुधार निधीची व वाचनालयास दिलेली बेकायदेशीर जागेची कसून चौकशी करण्यासोबतच वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेले उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाने आज मालेगांव पंचायत समिती समोर सुरु केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला उंदड असा प्रतिसाद लाभला.या उपोषण आंदोलनात निलेश भोये भिमखेत,गोपीनाथ भोये भिमखेत,सुनील गांगुर्ड कळमदरे चांदवड,कन्हैयालाल ढोढरे मालेगांव,विजय बागूल डांगसौंदाणे,संभाजी वाघ कळवण,अरुण शिरोळे नाशिक ग्रामीण,दावल पगारे लखमापूर,नयन शिवदे ठेंगोडा,भाऊसाहेब भामरे ब्राम्हणगाव,सुभाष अंकुशे जायखेडा,निंबा जाधव तळवाडे,प्रवीण पवार ताहराबाद,किशोर अंकुशे आसखेडा,हनुमंत माळी,श्रीमती शांताबाई माळी कौळाणे,महेंद्र शेवाळे व-हाणे,सागर वाघ कळवण,काकासाहेब सांळुके झाडी,बाळासाहेब निकम कळवण, शांताराम गायकवाड दळवट,आर्यन साळवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमती विजया माळी ,पत्रकार आंशूराज पाटील आदी बहुसंख्येने उपस्थित होते.या आंदोलन स्थळी माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा खासदार सुभाष बाबा भामरे,एन.डी.सी.सी.बँकेचे संचालक अव्दय आबा हिरे -पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम,भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,भाजप गटनेते सुनील आबा गायकवाड,माजी नगरसेवक मदन बापू गायकवाड,देवा पाटील,हरिप्रसाद गुप्ता ,भारत म्हसदे आदीनी भेट देऊन उपोषणाची तात्काळ दखल घेत,अधिकाऱ्यांशी चर्चा याप्रकरणी कार्यवाही करण्याच्या सुचना केल्यात,त्यानुसार अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत वरील मागण्यांची आश्वासनपुर्ती येत्या आँक्टोबर महिना अखेर करण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण आंदोलनाची तात्पुरुती सांगता करण्यात आली.यावेळी विस्तारधिकारी सुनील बच्छाव,महाले,कौळाणेचे ग्रामसेवक दिनेश जाधव,ग्रामसेवक टि.एम.बच्छाव,व सहा गटविकास अधिकारी भास्कर जाधव आदी अधिकारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.यावेळी कँम्प पोलिस स्टेशनचे पो.काँ.रुपचंद पारधी,नंदू चव्हाण,पाटोळे आदीनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleपत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
Next articleनांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास जिल्ह्यातील कार्यकत्यांनी उपस्थित राहावे — साईनाथ शिनगारे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here