Home नाशिक पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

58
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

20220918_121247-BlendCollage.jpg

पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
मालेगांव,- व-हाणे ,ता.मालेगांव येथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांच्या मनमानी व गैरकारभाराविषयी वारंवार लेखी तक्रारी केल्यावरही त्यांचेवर प्रशासनाकडून अद्याप कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने येत्या गुरुवार पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे. संबधिताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,व-हाणे गावी युवा मराठा परिवाराची शासकीय जागेवर पाणपोई असून,त्या पाणपोईचे उदघाटन दस्तुरखुद्द ग्रामसेविका सांळुखे यांनी करुन आणि सदरची जागा युवा मराठाच्या पत्रकार भवनास देण्याचे मान्य करुन त्यासाठी पैसे घेऊनही टाळाटाळ करीत असल्याने व गावातच एका वाचनालयास बेकायदेशीररित्या शासकीय जागा बहाल केल्याचा प्रताप विस्तारधिकारीच्या चौकशीत उघड होऊनसुध्दा अद्याप संबंधित ग्रामसेविकेवर कुठलीही कारवाई झालेली नसल्याने आमरण उपोषण छेडत असल्याचा आपला निर्णय ठाम असल्याचे पत्रकार राऊत पाटील यांनी सांगितले .

Previous articleयंदाची दिवाळी साजरी करावी लागणार पावसाळ्यात
Next articleव-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here