Home बुलढाणा महाआरोग्य शिबीरात तपासणी कलेल्या रुग्णांची पुढील उपचारासाठी रवानगी!

महाआरोग्य शिबीरात तपासणी कलेल्या रुग्णांची पुढील उपचारासाठी रवानगी!

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_184721.jpg

महाआरोग्य शिबीरात तपासणी कलेल्या रुग्णांची पुढील उपचारासाठी रवानगी!

संगितराव भोंगळ यांनी लक्झरी बसला दिली झेंडी.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ उपाख्य राजु पाटिल तथा डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.जळगांव (खान्देश) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य तपासणी व उपचार शिबीर पार पडले. या शिबीरात रुग्णांनी हृदयरोग तपासणी,2D इको ईसीजी,शुगर तपासणी,नाक,कान,घसा तपासणी,मोतीबिंन्दु शस्त्रक्रिया,महिलांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यात आल्या होत्या.या महाआरोग्य शिबीरात बहुसंख्य रुग्णांनी उपचार घेतले त्या रुग्णांना पुढिल उपचारासाठी पाठविण्यात आले. शिबीरात शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्याची आज दि.१९ डिसेंबर रोजी.रुग्णांना लक्झरी बस ने डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव (खान्देश) येथे पाठविण्यात आले. यावेळी लक्झरी बस ला संगितराव भोंगळ यांनी झेंडी दिली. यावेळी रुग्णांचे नातेवाईक व गावकरी बहुसंख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here