Home रत्नागिरी मुसळधार पावसाने चांदेराई बाजारपेठ २४ तास पाण्याखाली

मुसळधार पावसाने चांदेराई बाजारपेठ २४ तास पाण्याखाली

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0035.jpg

मुसळधार पावसाने चांदेराई बाजारपेठ २४ तास पाण्याखाली                                                      रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले व संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता बाजारपेठेत शिरलेले पाणी आज दिनांक 9 ऑगस्टला सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास पाणी बाजारपेठेत होते.

चांदेराई सहित हरचेरी, सोमेश्वर, तोनदे, हातीस या भागात पुराचे पाणी शिरले होते. काल रात्रीपासून विद्युत प्रवाह देखील खंडित झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरचा चिखल दूर करण्यासाठी जरूर ती उपाय योजना करावी व या घटनेचे तात्काळ पंचनामे करून पूरग्रस्तांना तात्काळ शासनाने मदत द्यावी अशी आग्रही मागणी चांदेराई चे माजी सरपंच दादा दळी यांनी केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी या बाजारपेठेत व बाजारपेठे शेजारी लोक वस्तीत जाते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना न केल्याने दरवर्षी ग्रामस्थांना या परिस्थितीला समोरे जावे लागते असे परखड मत दादा दळी माजी सरपंच चांदेराई यांनी व्यक्त केले आहे.

Previous articleबावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत
Next articleगोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मुख्यमंत्र्यांची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here