• Home
  • 🛑 मुसळधार पावसामुळे कोथरूड भागा मधे पाणी साचले 🛑

🛑 मुसळधार पावसामुळे कोथरूड भागा मधे पाणी साचले 🛑

🛑 मुसळधार पावसामुळे कोथरूड भागा मधे पाणी साचले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे/कोथरुड :-⭕बुधवारी दिवसभर आणि रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे प्रभागात विविध ठिकाणी पाणी शिरले होते.

आज सकाळपासून प्रभागातील ज्या परिसरात पाणी शिरले होते अशा कुंबरे पार्क या ठिकाणी #महापौर_मुरलीधरआण्णा_मोहोळ,सहाय्यक महापालिका उपायुक्त श्री.संदिपजी कदम,आपत्ती व्यवस्थापन चे श्री.येवलेकर,कनिष्ठ अभियंता श्री.स्वप्निलजी खोत,श्री.उमेश कुरे,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.रामजी सोनवणे,महानगर पालिकेचे कर्मचारी वर्ग यांसमवेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व महापौरांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

त्याच बरोबर #डावी_भुसारी काॅलनी येथे सुरक्षा भींत पडली,#उजवी_भुसारी लेन नं २ मध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरले,#कोथरूड_डेपो चौक व #कलाग्राम_सोसायटी येथील तळ मजल्यावरील फ्लॅट व दुकानांमध्ये पाणी शिरले,#इंदीरा_शंकर नगरी येथील घरांमध्ये पाणी शिरले,#मेट्रो_स्टेशन शेजारील सोसायट्यांमध्ये व समोरील #आसावरी_सोसायटी मध्ये पार्कींग मध्ये पाणी साठले,#शास्रीनगर_शिवांजली मंडळा जवळ,#मोहोळ चाळ,#लाल बहादूर शास्री चाळ,#सागर काॅलनी,#श्रीकृष्ण नगर या वस्ती विभागातील नाल्या लगत असलेल्या अनेक घरात पाणी शिरले व त्यांचे नुकसान झाले,#परमहंस_नगर येथील नाल्यालगतच्या सोसायटी व बंगल्यांमध्ये देखील पाणी शिरले.
सदर वर उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन संबधीत विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत पहाणी केली व लगेचच उपाययोजना करून कामाला सुरवात देखील करण्यात आली.
अजूनही २-३ दिवस पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.⭕

anews Banner

Leave A Comment