Home माझं गाव माझं गा-हाणं एका डोळ्यात युवक आणि युवतीचे ‘प्रेम’ आणि दुसऱ्या डोळ्यात ‘आत्महतयेच्या प्रयत्नांचा गेम’,...

एका डोळ्यात युवक आणि युवतीचे ‘प्रेम’ आणि दुसऱ्या डोळ्यात ‘आत्महतयेच्या प्रयत्नांचा गेम’, युवक आणि युवतीचे ‘ठरले नाही लग्न ‘ म्हणून नेहमीच आयुष्यातून संपवण्याच्या विचारात ‘मग्न’… !*

217
0

राजेंद्र पाटील राऊत

(भिला आहेर,प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:-प्रेम झाले आणि लग्न होत नाही म्हणून नैराश्यातून आत्महत्येसारखा पर्याय प्रेमीयुगलांनी निवडला. मात्र वेळीच दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन प्रेमीयुगलांची “दो हंसो का जोडा बिछड गयो रे”म्हणण्यासरखी दुदैवी घटना टळली आहे.पण…या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात एक चर्चला उधाण आले आहे.

 

देवळा शहरात काल एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून अल्पवयीन प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले, सदर स्टेटस अल्पवयीन युवकाच्या मित्रांनी बघून ताबडतोब हॉटेल गाठून याबाबतची माहिती हॉटेल चालकांना दिली व त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करून त्यांचा जीव वाचविण्यात आला व पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की या प्रेमीयुगुलापैकी युवकाचे वय 18 वर्षे व युवतीचे 17 वर्षे आहे , मुलगी फुले माळवाडी तर मुलगा हांडवा शिवारातील असून दोघांची ओळख संगणकाचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासमध्ये झाली होती, ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन, भेटीगाठी होत राहिल्या, एकमेकांवरील प्रेम अधिक घट्ट होत दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याच्या व लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या, परंतु घरचे लग्नाला संमती देतील की नाही तसेच गावातील लोक विरोध करतील या विचाराने नैराश्यात येऊन त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्राथमिक माहितीतून लक्षात आले आहे,
काल गुरुवार ता. 14, रोजी भेटण्यासाठी त्यांनी देवळा शहरातील वेलकम हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेतली व रूम मध्येच व्हाट्सएप ला आत्महत्या करतोय असे स्टेटस ठेवून शेतीसाठी वापरण्यात येणारे तणनाशक/ विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
परंतु युवकाच्या मित्रांनी स्टेटस बघून ताबडतोब हॉटेल गाठले व घडलेला प्रकार पोलिसांपर्यंत गेला त्यामुळे त्यांचा जीव वाचविण्यात यश आले.

स्टेटस ने वाचवला जीव
आज-काल प्रेम कोणत्या वयात करावे, ते यशस्वी करण्यासाठी काय प्रयत्न करावे याचा विचार न करता बरेच प्रेमी युवक-युवती आत्महत्येसारखा सोपा मार्ग निवडतात, परंतु देवळा येथे घडलेल्या या घटनेत व्हाट्सअप स्टेटस मित्रांनी वेळीच बघून हालचाल केल्याने सदर प्रेमी युगुलाचा जीव वाचला आहे.

पालकांची उदासीनता कारणीभूत?
सध्याच्या बहुतांश पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही किंवा त्यांना तशी गरज वाटत नाही असाच काही प्रकार या अशा प्रकरणांतून दिसून येत आहे, प्रौगंडवस्थेत असणाऱ्या आपल्या किशोवयीन मुला मुलींची प्रेम तसेच लैंगिक शिक्षण याबाबत खुलेपणाने चर्चा करून त्यांना विश्वासात घेणे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे, परंतु सध्याच्या सोशल मीडिया, व्हॉट्सऍप, टीव्ही वर व्यस्त असणाऱ्या आजच्या जमान्यात आईला सुद्धा आपल्या मुलीकडे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे निदर्शनास येत आहे, पालकांचा आपल्या मुलांवरील फाजील आत्मविश्वास एखाद्या दुर्दैवी घटनेचे निमित्त ठरू शकतो याची पुसटशी कल्पनाही पालकांना नसते, ही खेदाची बाब असून या प्रकरणाने तरी पालकांनी धडा घ्यावा.

आज-काल ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे मोबाईल देण्यात येतात, परंतु हे विद्यार्थी त्या मोबाईलवर काय करत असतात याबाबत खूप अल्प प्रमाणातच पालक लक्ष ठेवून असतात, आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांना सामाजिक जीवनाची कल्पना देऊन चांगल्या वाईट गोष्टींची समज देणे हे पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे परंतु याकडे फारसे लक्ष दिले जात नाही त्यामुळे कमी वयातच मुले अगदी पुढच्या पायऱ्या गाठत स्वतःचे नुकसान करून बसतात.

हॉटेल व्यवस्थापकासह प्रेमी युगुलावरही गुन्हा
शासनाच्या नियमानुसार कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही हॉटेल/ लॉजमध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्याजवळील आधार कार्ड व सामानाची तपासणी करणे अनिवार्य आहे,
तसेच सदर व्यक्तीची नोंदणी हॉटेलवर रिसेप्शन मध्ये असणाऱ्या नोंदवहीत करणे गरजेचे आहे, परंतु अशा कोणत्याही प्रकारची नोंद किंवा कागदपत्रांची मागणी केली नसल्याने शासकीय आदेशाचे उल्लंघन केले म्हणून हॉटेल मॅनेजर दीपक सुभाष आहिरे रा. चिराई यांच्यावर पो. ना. गवळी यांच्या फिर्यादीवरून शासकीय आदेशाचे उल्लंघन तसेच अपराध्यास सहाय्य केल्याबद्दल तसेच प्रेमीयुगुलावर आत्महत्येच्या प्रयत्नामुळे भा.दं.वि. कलम 309,114,188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक रामदास गवळी करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here