Home नांदेड दीपावळीत हिमायतनगर येथील सूर्यवंशी कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात पती गंभीर, पत्नीचा मृत्यू,...

दीपावळीत हिमायतनगर येथील सूर्यवंशी कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात पती गंभीर, पत्नीचा मृत्यू, दोन बालके किरकोळ जखमी

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0014.jpg

दीपावळीत हिमायतनगर येथील सूर्यवंशी कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात पती गंभीर, पत्नीचा मृत्यू, दोन बालके किरकोळ जखमी

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड:दि.24.दीपावली निमित्त पुणे येथून गावाकडे येत असताना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील व्यापारी श्रीकांत सूर्यवंशी यांच्या वाहनाचा बीड जवळ अपघात झाला आहे. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते.

उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून,तर श्रीकांत सुर्यवंशी हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. दोन बालकांनाही जखमा झाल्या असून, मयत झालेल्या सौ भाग्यश्री सूर्यवंशी यांचे पार्थिवावर आज हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर येथील श्रीकांत सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे गेले होते.

आता दिवाळी असल्याने कुटुंबीय आपल्या कारणे हिमायतनगर मूळ गावाकडे येत असताना बीडला भीषण अपघात झाला. त्यात श्रीकांत रामराव सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले,त्यांच्या पत्नी सौ भाग्यश्री श्रीकांत सुर्यवंशी यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. दोन्ही बालकांना किरकोळ जखमा झाल्या.त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हालवण्यात आले आहे.

घरातील कुटुंबीय दिवाळीच्या आनंदाच्या तयारीत असताना काळाने घाला घातला.आणि ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सूर्यवंशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेत मयत झालेल्या सौ.भाग्यश्री श्रीकांत सूर्यवंशी यांचे प्रेत हिमायतनगर येथे आणले जात असून,त्यांच्या पार्थिवावर आज ठीक 10, 30 वाजता हिमायतनगर येथील लकडोबा चौक परिसरात असलेल्या हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. अचानक घडलेल्या या घटनेने हिमायतनगर शहरावर देखील दुःखाचे सावट निर्माण झाले आहे.

या दुःखातून सावरण्याची ईश्वर सूर्यवंशी कुटुंब यांना शक्ती देवो अशा प्रकारे अनेकांनी स्वर्गीय भाग्यश्री सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Previous articleमा.खा.श्री.अशोकजी नेते यांनी दाखवीली माणुसकी…
Next articleपुणेत इलेक्टाँनिक वस्तू विक्री केंद्राचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here