Home माझं गाव माझं गा-हाणं महाड पोलादपूर पुरग्रस्तांना सटाणावासियांची मदत

महाड पोलादपूर पुरग्रस्तांना सटाणावासियांची मदत

130
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा:-(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यातील अनेक गावात दि.२२ जुलै रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परीस्थितीत महाड शहरासह आजूबाजूच्या परिसरात पाणी घरांमध्ये व दुकानात शिरून येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले अनेकांचे संसार उघड्यावर पडून रोजच्या जगण्याचा प्रश्न सर्व नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.

साई सावली फाऊंडेशन व लोकमंथन यांनी सामाजिक जाणिवेतून पुरग्रतांच्या मदतीसाठी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बागलाण तालुक्यातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले. दानशूर नागरिक व विविध सामाजिक संस्थांनी या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद दिला असुन जमा झालेली सर्व मदत
गुरुवार दि. ०५ रोजी नाशिक येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, कार्यलयीन उपविभागीय पोलीस अधीक्षक श्यामकांत निपुंगे, लोकमंथनचे कुमार कडलग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर सटाणा येथे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई, सहा.गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, बचत गट समनव्यक सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली जाधव, स्मिता येवला, रवींद्र वाघ, प्रतिष्ठित व्यापारी अंकुश छाजेड यांच्या हस्ते सटाणा येथे तर नाशिक येथे हस्ते श्रीफळ वाढवुन मदत पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आली यावेळी आबा दुसाने, विजय जगदाळे, संजय जाधव, अब्दुल बोहरी, किशोर म्हसदे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, प्रहार तालुकाध्यक्ष तुषार खैरणार, पंडित आहिरे, पोलीस कर्मचारी योगेश गुंजाळ, हेमंत कदम, रवींद्र भामरे, पंकज शेवाळे, प्रकाश शिंदे, साहेबराव गायकवाड, मदत गोळा करण्यासाठी परिश्रम घेतलेले लोकमंथनचे संतोष जाधव, साई सावली फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत कोठावदे, रविराज बच्छाव, शरद गोरे, आनंद दाणी, कृष्णा जगताप, साई सावलीचे पंकज सोनवणे, चेतन सूर्यवंशी, भुषण निकम, योगेश पाटील, विजय सोनवणे, सुमित सोनवणे, सचिन कोठावदे, प्रफुल्ल कुवर, रोहित येवला, योगेश सोनवणे, उमेश कापडणीस आदी उपस्थित होते.

महाड व पोलादपूर तालुक्यात यशवंत नगरीतून शुक्रवार दि.०६ रोजी पोहोच झालेली मदत महाड-पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले व महाडचे समाजसेवक डॉ विनोदराव मोरे यांच्या माध्यमातून सर्व माहिती घेत लोकमंथनचे संतोष जाधव, साई सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाणी शरद गोरे, कृष्णा जगताप यांनी मदत पोहोच न झालेल्या ताम्हणे, निवे, कातकरवाडी, गवळीवाडी, चांभारगणी, नडगाव, तूरवळा, बोराह, खरवली ह्या पूरग्रस्त भागातील कुटुंबांची भेट घेवून यशवंत नगरी मधुन आलेली मदत देत मदतीचा हात दिला आहे.

साई सावली फाऊंडेशनचे व लोकमंथन यांच्या माध्यमातून कोकणवासीयांना साठी एक हात मदतीचा आपल्या कोकण वासीयांसाठी केलेल्या आवाहनाला बागलाण वासीयांनी भर भरून मदत दिली हि मदत बागलाण पंचायत समिती सभागृहात जमा करत बचत गट महिला व साई सावली फाऊंडेशनच्या सदस्यांच्या माध्यमातून चार दिवसात तांदूळ, गहू, साखर, डाळ, मसाले, आघोळीचे साबण, कपडे धुवायचे साबण, टूथपेस्ट, ब्रश, साड्या, गाऊन, ब्लॅंकेट, अंडरवियर, सॅनिटरीनॅपकिन, मीठ, खोबरेल तेल, लहान मुलांचे कपडे आदी साहित्याची किट तयार करत महाड व पोलादपूर तालुक्यातील अनेक गावात वाटप करण्यात आले.

पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, यशवंतराव महाराज ट्रस्ट अध्यक्ष भालचंद्र बागड, सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, वर्षा जाधव, जायखेड्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई, वनपाल रुपेश दुसाने, सहा.गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, बचत गट समनव्यक सचिन पाटील, रुपाली जाधव, एजाज शेख, आदींसह मदत रवाना होते वेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Previous articleवनपट टिंगरीचा तलाठी अनंता वायाळ, सात हजाराची लाच घेताना झाला एसीबीकडून घायाळ!
Next articleजागतिक आदिवासी दिनानिमित बालविद्यार्थीनी दिव्यानीचे कौतुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here