Home नाशिक दुचाकी वाहनासाठी नवीन मालिका सुरु; पसंती क्रमाकांसाठी इच्छुकांनी 11 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावेत

दुचाकी वाहनासाठी नवीन मालिका सुरु; पसंती क्रमाकांसाठी इच्छुकांनी 11 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावेत

78
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

 (उमाका वृत्तसेवा):

 दुचाकी मोटार वाहन संवर्गातील वाहनांसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथे नविन मालिका  MH-41BN सुरु करण्यात येत आहे. या अनुषंगाने इच्छुकांनी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी विहित नमुन्यातील अर्ज  11 ऑक्टोंबर  रोजी  सकाळी  11.00 ते 2.30  यावेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संबंधित विभागात जमा करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी  केले आहे.

अर्ज करतांना ज्या व्यक्तीच्या नावे वाहन खरेदी केले असेल त्याच व्यक्तीच्या नावाने अर्ज सादर करावा. अर्जासोबत फोटो ओळखपत्र,  निवासी  पुराव्यासाठी आधारकार्ड, विजबील, घरपट्टीची साक्षांकित प्रत, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकीत  प्रती जोडणे आवश्यक राहील.

 तसेच पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेचे  डिमांड ड्राफ्टद्वारे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव यांचे नावे भरणे आवश्यक असून सोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक राहील. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलुन किंवा रद्द  करता येणार नाही.  एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी  दु. 4.00  वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहीत केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कमेचे डिमांड ड्राप्ट बंद पाकीटात सादर करावे लागतील. जो अर्जदार विहीत शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. सदर आकर्षक क्रमांकाचे शासकीय विहित शुल्काबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथील नोटीस बोर्डवर देखील प्रदर्शित करण्यात आली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here