Home नाशिक जि प शाळा कळमदरे येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

जि प शाळा कळमदरे येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

226
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0067.jpg

जि प शाळा कळमदरे येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा
चांदवड,(प्रतिनिधी सुनील गांगुर्ड)
जि प प्राथ. शाळा कळमदरे येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला.याप्रसंगी ध्वजाचे पूजन विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री दत्तू बाबुराव गांगुर्डे व ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री राजेशजी गांगुर्डे यांनी केले,श्री जनार्दन पुंजा गांगुर्डे यांनी ध्वजाला श्रीफळ वाढवले,शाळेचे SMC अध्यक्ष श्री. बारकू आबाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

शाळेकरीता शाश्वत व कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी याकरिता आँस्टेनेटीक द्राक्षतार परिवार गोदावरी अँन्ड लक्ष्मी वैद्य फाउंडेशन यांच्या तर्फे एरिया डेव्हलपमेंट मॅनेजर नासिक जिल्हा श्री विकास दवंगे सर, सहकारी आप्पा गाडे,राकेश जिवरक, श्री खंडू गांगुर्डे कळमदरे यांच्या सहकार्याने शाळेसाठी ८०,००० रुपयेचे वॉटर फिल्टर देण्यात आले. ग्रामपंचायतीतर्फे शाळेसाठी १५००० रुपयेची साऊंड सिस्टिम असा एकूण ९५ हजार रुपयांचा लोकसहभाग वस्तू रूपाने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेसाठी मिळाला.
कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ वर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच सदस्य, SMC, विविध कार्यकारी सोसायटी, वन व्यवस्थापन समिती, तंटामुक्ती समिती, विविध समित्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, गावातील युवक मंडळ,पालक वर्ग अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका, शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक श्रीमती जयश्री वनवे मॅडम,शिक्षक श्री सोमनाथ घोंगडे सर, श्रीम. सोनाली हिरे मॅडम, कु. अस्मिता जाधव मॅडम यांनी मेहनत घेतली.

Previous articleकातरणी ते श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पायी दिंडीस प्रारंभ
Next articleलासलगांवचे डाँ अमोल शेजवळ मुळव्याध,भगंदर रुग्णांसाठी ठरलेत देवदुत!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here