Home नाशिक कातरणी ते श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पायी दिंडीस प्रारंभ

कातरणी ते श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पायी दिंडीस प्रारंभ

635
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0066.jpg

कातरणी ते श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पायी दिंडीस प्रारंभ

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

गत १५वर्षापासुन अखंड सुरु असलेली पायी दिंडी याही वर्षी मोठ्या उत्साहात नस्तनपुर कडे बुधवारी प्रस्थान केले, अनेक समस्या ग्रस्त असलेल्यांना व अनेकांचे स्वप्न ,इच्छा आकांशा व नवसाला पावणा-या शनि महाराज यांच्या दर्शनाला अनेक अबालवृद्धांना घेऊन, दिडीं चालक मधुकर सहादु कदम, रावसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ,१५वर्षापुर्वी ३० शनिभक्तांपासुन सुरुवात झाली, आज या दिडींत ३५० भाविक चालत आहे, कातरणी येथे विठ्ठल मंदिर येथे सर्व शनिभक्त विठ्ठलाचे अभंग घेऊन शनि महाराज यांचा नामघोष करत रामदास वैराळ यांच्या वस्ती वर महाप्रसाद पंगत आटोपुन वडगाव मार्गे केकानवाडा ,मनमाड येथे महाप्रसाद व मुक्काम असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी नास्ता आटोपुन हिसवळ येथील रघुनाथ करवर यांचे येथे मुक्काम व पंगत असते,तिसर्या दिवशी नांदगाव येथील जितेंद्र सुदाम सरोदे मंगलकार्यात मुक्कामी असलेल्या सर्वांना महाप्रसाद देतात, चवथ्या दिवशी शनिवारी, श्री क्षेत्र नस्तनपुर येथे सकाळी दिंडी चे आगमन होऊन चांदोरा येथील भजनी मंडळ यांच्या सौजन्याने, हभप भावराव महाराज पवार (जोधंळवाडी) यांचे सकाळी ११वाजता काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल,या दिंडी सोहळ्यात नवनाथ वैराळ,चंद्रभान कोल्हे, आत्माराम कोल्हे, उत्तम दरगुडे, माधव कदम, धोंडु रसाळ, भागवत नवले, दिलीप गोजरे व शेजारील गावातुन आलेले अनेक भाविक पायी चालत आहे, दिंडी प्रस्थान च्या वेळी, लक्ष्मण कदम, सामाजिक कार्यकर्ते विजय कुऱ्हाडे, भावराव शेठ, अनिल कदम, दादा पांडुरंग कदम, सचिन महाराज, जनार्दन महाराज, निवृत्ती महाराज, तुकाराम कोल्हे, शिवाजी कदम, रंगनाथ झाल्टे, नामदेव कदम हे उपस्थित होते,

Previous articleभारतीय जनता पक्षातर्फे विविध पदासाठी निवड प्रक्रिया संपन्न
Next articleजि प शाळा कळमदरे येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here