Home नांदेड भारतीय जनता पक्षातर्फे विविध पदासाठी निवड प्रक्रिया संपन्न

भारतीय जनता पक्षातर्फे विविध पदासाठी निवड प्रक्रिया संपन्न

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0065.jpg

भारतीय जनता पक्षातर्फे विविध पदासाठी निवड प्रक्रिया संपन्न

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

आज दि :- 17 ऑगस्ट 2023 देगलूर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडी संदर्भात देगलूर येथील शासकीय विश्रामगृह येथे देगलूर शहर व तालुक्यातील इच्छुक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या सदर निवड प्रक्रियेत ७० इच्छुकांनी सहभाग नोंदवला. भारतीय जनता पक्षात इच्छुकांची गर्दी पाहता आगामी कालावधीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा विधानसभा व सर्वच निवडणुकांत जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल यात कुठलीही शंका उरत नाही. आज देगलूर येथे पार पडलेल्या निवड प्रक्रियेप्रसंगी माझ्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार गजाननराव घुगे साहेब, भाजप प्रदेश सचिव देविदासजी राठोड, माजी आमदार सुभाषजी साबणे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ.माधवराव उच्चेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी कनकटे, शहराध्यक्ष अशोक गंधपार, युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष पंकज देशमुख, शिवकुमार देवाडे, माजी नगसेवक प्रशांत दासरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील शेळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस अनिल पाटील खानापूरकर, उत्तमराव कांबळे, आत्माराम पाटील, संतोष पाटील, शिवराज पाटील माळेगावकर, बबन पाटील गोजेगावकर, रवी पाटील नरंगलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी अन्य मान्यवर मोठ्या संख्येने व प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleदेगलूर येथिल संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे.
Next articleकातरणी ते श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पायी दिंडीस प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here