Home अमरावती आमदार रवी राणा यांनी किती पैसे दिले अन् आमदार यशोमती ठाकूर यांनी...

आमदार रवी राणा यांनी किती पैसे दिले अन् आमदार यशोमती ठाकूर यांनी किती घेतले? आम. बच्चू कडू यांची चौकशीची मागणी.

92
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230917-080115_WhatsApp.jpg

आमदार रवी राणा यांनी किती पैसे दिले अन् आमदार यशोमती ठाकूर यांनी किती घेतले? आम. बच्चू कडू यांची चौकशीची मागणी.
——————————
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांना दिलेल्या कडक नोटांच्या व्याहाराची चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी केली यांनी किती पैसे दिले व आम. यशोमती ठाकूर यांनी किती घेतले याची चौकशी होणे गरजेचे आहे. असे आमदार बच्चू कडू म्हणाले. गप काही दिवसापासून अमरावतीचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांचे काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी सुरू यशोमती ताई ठाकूर यांनी २०१९च्या निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून क नोटा घेतला तर खा. नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर आम. यशोमती ठाकूर यांनी त्यांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. आताआम. बच्चू कडू यांनी वादात उडी घेत याप्रकरणी पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्या प्रकारे पैसे घेणारा तितकाच दोषी तितकाच सर्वप्रथम पैसा देणारा दोशी असेल असे आमदार बच्चू कडू एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना २०१९ मध्ये पैसे दिल्याचा आरोप केला आहे. मुळात हे चुकीचे आहे. याप्रकरणी सर्वप्रथम पैसा देणारा चुकीचा आहे. मी याविषयी पोलीस आयुक्त कडे तक्रार करणार आहे असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. खासदार नवनीत राणा यांनी सर्वांसमोर आरोप केला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी किती पैसे दिले व यशोमती ठाकूर यांनी किती घेतले?, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांनी २०१९च्या निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्यापण नंतर त्यांनी दुसऱ्याच्या प्रचार केला . त्यांना यापुढे मंत्रीपद मिळेल किंवा नाही याची खात्री नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला,तेव्हा त्या यादीत येशू मध्ये ठाकूर यांचे नाव होते. पण मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली नाही. असा आरोप नवनीत राणा यांनी मंगळवारी पत्रकाराशी केला होता. याबाबत यशोमती ठाकूर चा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा सुद्धा आहे. नवनीत राणा यांचा हा आरोप जिव्हारी लागल्यानंतर त्याच्यामुळे ती ठाकूर चांगल्याच भडकल्या राणा यांनी शहाणपणा करत बोलायचे नाही. आरोप सिद्ध करावे. त्या नवरा बायकोने आजपर्यंत अमरावती जिल्हा नासवण्याची काम केले आहे. त्यांचे कोणाशीच पटत नाही. मी त्यांच्या विरोधात१०० कोटीचा दावा ठोकणार आहोत. रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे आम्ही असे आरोप सहन करणार नाही कोणीही उगाच अफवा पसरण्याचे काम करू नये. आम्ही ताईचा वहिनी म्हणून शिकार केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दारोदार फिरलो. त्यांचे प्रमाणपत्र खोटे निघाले.त्या त्या चोर निघाल्या. त्यामुळे राहणार नाही अवकातीत राहावे असे यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणी म्हणाल्या होत्या. येशू मध्ये ठाकूर या प्रकरणी राहणार निशान संस्थांना म्हणाल्या की, शहाण्यांना सांगा लायकीत राहा. माझ्या बापाने आणि कुटुंबाने जमीन घेण्याची नाही देण्याचे काम केले. आजही निवडणुकीत आम्हाला एखादा एकर शेती विकावी लागते. फॅक्ट आहे. मुळे आम्ही रानासारखी फालतुगिरी सहन करणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here