• Home
  •   *जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*

  *जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*

*जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*

*युवा मराठा न्यूज*

वाळवा तालुक्यातील घटना :
आपल्या जिवलग दोस्ताचा पाठलाग करुन धारधार शस्त्राने वार करून  निर्घृण खून केल्याची घटना आज वाघवाडी – पेठ दरम्यान असणाऱ्या मधल्या रस्त्यावर दुपारी घडली आहे.
या घटनेत अभिजित हरी शेलार ( वय वर्ष २२ ) मूळ गाव पेठ,ता.वाळवा सध्या राहणार जांभळवाडी याचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र  मारुती बांदल (वय वर्ष२५)  रा जांबळवाडी असे आरोपीचे नाव आहे.
मयत अभिजीत शेलार आणि संशयित आरोपी राजेंद्र बांदल हे दोघे जिवलग मित्र होते. परंतु आज हे मित्रच एकमेकांच्या जीवावर उठले. आज बुधवार दुपारी राजेंद्र बांदल यांने अभिजित शेलार वाघवाडी रोडवर पाठलाग करून एका शेतात त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. अभिजित याच्या अंगावर जवळ जवळ दहा जबरी वार होते व शेवटी गळा चिरून त्याचा शेवट केला. घटना स्थळावर बघ्यांची खुपगर्दी जमली होती. मयत अभिजित याचे मूळ गाव पेठ ता.वाळवा असून तो मामाकडे जांभळंवाडी येथे राहात होता .राजेंद्र व अभिजित जिवलग दोस्त होते. मात्र एका अनैतिक संबंधाच्या रागातून ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.
खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसात हजर झाला आहे. घटना स्थळास पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भेट दिली. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असून  मयत अभिजित ची आई सुवर्णा शेलार यांनी फिर्याद दिली आहे . इस्लामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

*कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*

anews Banner

Leave A Comment