Home नांदेड प्रत्येकांनी आई-वडिलांची सेवा करावी -हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर

प्रत्येकांनी आई-वडिलांची सेवा करावी -हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर

42
0

आशाताई बच्छाव

IMG_20231225_094237.jpg

प्रत्येकांनी आई-वडिलांची सेवा करावी -हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर

लोहा प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार

आईवडीलांचे स्थान हे जिवनात अतिशय महत्त्वाचे असून त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांनी सांगितले.
लोहा तालुक्यातील पारडी येथे (दि.)२१.डिसेंबर २०२३ रोजी कै.पांडुरंग पाटील पवार यांच्या स्मरणार्थ श्री हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांचा हरिकिर्तनाचा व गोडजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी श्री हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर म्हणाले की,आई वडीलांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे.प्रत्येकांने आपल्या आई वडीलांची सेवा करावी.ईश्वराचे नाम घ्यावे.यावेळी संपुर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजरात,पांडुरंगाच्या नामस्मरणात किर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन गेला. हरि किर्तनाच्या कार्यक्रमानंतर गोडजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, शिवसेनेचे संघटक एकनाथ दादा पवार, माजी नगराध्यक्ष सौ आशाताई रोहिदास चव्हाण, माजी जि प सदस्य विठ्ठलराव शेटकर, जि प सदस्य प्र. रंगनाथ राव भुजबळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य नवनाथ (बापूसाहेब)रोहिदास चव्हाण,माजी सरपंच दिगांबर पाटील डिकळे,डी टी महामुने,शिवा संघटना उपाध्यक्ष साधू पाटील वडजे,सरपंच रामेश्वर पाटील,माजी सरपंच भिमराव पाटील शिंदे,व्हा.चेअरमन शिवाजी पाटील बुद्रुक,जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे,साहेबराव सोनकांबळे, बापू गायकर,संजय कहाळेकर,मोहन पाटील पवार,पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास सावळे,रमेश पाटील पवार,शिवराज दाढेल,प्रेस फोटोग्राफर विनोद महाबळे,
टि के.दाढेल,सुलतान शेख,प्रदिप हटकर, दशरथ लिंबोटकर,माधव वंजारे, विनायक सेवनकर,विलास राठोड परिसरातील सरपंच,उपसरपंच,माजी सरपंच,चेअरमन,कै.पांडुरंग पाटील पवार यांचे सुपूत्र शिवराज पाटील पवार, भगवान पाटील पवार, गणेश पाटील पवार, पुतणे बालाजी संभाजी पाटील पवार, नातू गोविंद आनंदा पवार, नातेवाईक यांच्यासह तालुक्यातील व पारडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleचोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी लोहा पोलिसांनी केले अटक.
Next articleभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नितीन काळे यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here