Home नांदेड चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी लोहा पोलिसांनी केले अटक.

चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी लोहा पोलिसांनी केले अटक.

78
0

आशाताई बच्छाव

IMG_20231225_090336.jpg

चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी लोहा पोलिसांनी केले अटक.

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

लोहा पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/10 /23 रोजी रात्री चार ते सहा च्या दरम्यान बायपास ब्रिज लोहा शिवारा जवळ चोरी करण्यात आली होती. सदर चोरीच्या घटनेमध्ये एकूण 34,500 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. सदर गुन्ह्यातील एक आरोपी लोहा पोलिसांनी तात्काळ त्या दिवशी अटक केला होता.
मात्र त्यामधील इतर पाच आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यामुळे व एका आरोपीस अटक केल्यामुळे फरार झालेले होते.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी सहाय्यक फौजदार केंद्रे, पोना आनंद भाडेकर, पोलीस अमलदार रवी कुमार मडके यांचे पथक तयार करण्यात आले होते, सदर पथकाने आरोपीच्या मागे खबरी लावून त्यांच्या येण्या-जाण्यावर पाळत ठेवली होती.

आज दि.24/12/2023 रोजी सदर आरोपी हे बस स्टॅन्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर आरोपीतांच्या विरोधात सापळा रचून त्यांना आज रोजी लोहा येथे अटक केली.

आज रोजी कैलास नकलवाड व 19 वर्ष कृष्णा गंठलवाड व 19 वर्ष पिंटू गंठलवाड वय 32 वर्ष रमेश गंठणवाड वय 36 वर्ष संजय गंठलवाड व 28 वर्ष सर्व राहणार बालाजी मंदिराच्या मागे लोहा या आरोपींना अटक करून त्यांना माननीय न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते. या सर्व आरोपींना माननीय न्यायालयाने एमसिआर केल्यामुळे त्यांना आज रोजी नांदेड येथील जेलमध्ये दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार रवी कुमार मडके यांच्या विशेष कामगिरीमुळे सहायक फौजदार केंद्रे, पोना भाडेकर, माधव डफडे दत्तात्रेय शेळके, मोरे यांनी केली.

Previous articleनांदेड़ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकेल – दिलीपराव शिंदे साहेब.
Next articleप्रत्येकांनी आई-वडिलांची सेवा करावी -हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here