Home नांदेड नांदेड़ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकेल – दिलीपराव शिंदे साहेब.

नांदेड़ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकेल – दिलीपराव शिंदे साहेब.

154

आशाताई बच्छाव

IMG_20231225_070122.jpg

नांदेड़ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकेल – दिलीपराव शिंदे साहेब.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नांदेड़ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकणार असून
त्या साठी शिवसैनीक जोमाने कामाला लगावे असे आवाहन शिवसेनेचे लोकसभा पक्ष निरीक्षण दिलीपराव शिंदे साहेब यांनी देगलूर येथील शिवसैनिकांच्या लोकसभा आठवा बैठकीत केले.
देगलूर कार्यालया शनिवार दिनांक 23/12/ 2023 गोविंद माधव मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे शिवसेना शिंदे गटाची लोकसभा आठवा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख(ST.OBC.NT) मागासवर्गीय विभाग मंगेश दादा कदम, चंद्रपूरचे संपर्कप्रमुख माझी जी.प सदस्य गंगाधर बडूरे, भिमराव चौगुले… देगलूर तालुका प्रमुख छाळप्पा अंबेसंगे, बिलोली तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे पाटील, नांदेड जिल्हा प्रमुख महिला आघाडी गीता ताई पुरोहित देगलूर व बिलोली आघाडी महिला प्रमुख सविताताई चप्पलवार, शिवाजीराव येडगुले, माजी नगरसेवक बिलोली महेंद गायकवाड, जिल्हा महासचिव वैभव धनगे, मागासवर्गीय विभाग शहर प्रमुख विजय सूर्यवंशी शिवसेना देगलूर संघटन महेश करंडे, शिवसेना शहर संघटन धनाजी जोशी उ.प.ता, प्रमुख व्यंकट भोळे, शिवसेना सोशल मीडिया दिगंबर जाधव व मधुकर पाटील, रजिराव शेटकर, मारुती असकले, नागेश जोशी,
व ओतराव वाघमारे व सर्व शिवसेना यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकसभा पक्ष निरीक्षण दिलीपराव शिंदे साहेब यांनी शिवसैनिकांना जोमाने कामाला लागा लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय होणार असून महायुतीचा ताकत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करा असे आवाहन उपस्थित बूथ प्रमुख, शिवदूत शिवसैनिकांना केले याप्रसंगी  रेखाताई पडलवार, राधाताई वाघमारे, पार्वतीताई मामीडवार, यांच्यासह अनेक महिलांनी व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या लोकसभा आढावा बैठकीला देगलूर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleराष्टसंतांनी आपल्या ग्रामगीतेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. -आ.सौ. सुलभाताई खोडके
Next articleचोरीच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी लोहा पोलिसांनी केले अटक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.