Home अमरावती राष्टसंतांनी आपल्या ग्रामगीतेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. -आ.सौ. सुलभाताई खोडके

राष्टसंतांनी आपल्या ग्रामगीतेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. -आ.सौ. सुलभाताई खोडके

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20231225_065745.jpg

राष्टसंतांनी आपल्या ग्रामगीतेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. -आ.सौ. सुलभाताई खोडके

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ वा पुण्यस्मृती सोहळ्यातून समाजप्रबोधनाचा संदेश

शेंगाव -गुरुकुंज कॉलनी येथील पुण्यस्मृती सोहळ्यात गुरुदेव भक्तांची मांदियाळी
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : महाराष्ट्रातील समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी,कवी,गायक असलेले थोर महान व्यक्तिमत्त्व म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय.यांना संपूर्ण जगात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराज यांनी इसविसन १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक ,सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते.एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल,अशी तुकडोजी महाराज यांची श्रद्धा व विचारसरणी होती. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदूच होता.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचे वैशिष्ट्य होते.त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामुदायिक व सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.आज खऱ्या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. याचा आपण खासकरून उल्लेख करू इच्छितो.असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ वा पुण्यस्मृती सोहळ्यात उपस्थितांना संबोधून केले. शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्था द्वारे आयोजित शेगाव रोड परिसर समीपस्थ गुरुकुंज कॉलोनी येथिल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मृती सोहळ्यात त्या बोलत होत्या.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष-रामधनजी कराळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ह. भ.प.सुश्री स्नेहगंगामाई शृंगारे( आळंदीकर) उपस्थित होत्या. सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते वंदन-पूजन-माल्यार्पण करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते शाल-पुष्पगुच्छ-स्मृतिचिन्ह देऊन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अतिथिंची समयोचित भाषणे झालीत.दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित कार्यक्रमात तिर्थस्थापना, सामुदायिक ध्यान,पालखी मिरवणूक ( शोभा यात्रा ),सामुदायिक प्रार्थना, प्रबोधन, कीर्तन,काल्याचे कीर्तन,महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रास्ताविक व आभार प्रदर्शन- गोवर्धन सगणे यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेचे सदस्य व पदाधिकारी तसेच वंदनीय तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ तथा गुरुकुंज कॉलोनी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here