Home अमरावती ग्रंथ दिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात.

ग्रंथ दिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात.

32
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_175414.jpg

ग्रंथ दिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात.
———–
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.

अमरावती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५व्या पुण्यस्मरण निमित्त शहरातील शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलना सुरुवात शनिवारी झाली. या राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटन पूर्वी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. अभियंता भवन येथून या ग्रंथ दिंडीला सुरुवात करण्यात आली. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची समाधी तसेच पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडी कार्यक्रम स्थळे पोहोचली. दोन दिवसीय या साहित्य संमेलनामध्ये विविध विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय, सामाजिक तथा सर्वगणा साहित्य प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, या उद्देशाने राष्ट्रधर्म युवा मंच यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. शनिवारी या साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ संत साहित्यिक विचारवंत बाभूळगावकर शास्त्री, उद्घाटक म्हणून ह भ प ज्ञानेश्वर महाराज इंगळे, अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर, आ. यशोमती ठाकूर ,लक्ष्मण गमे ,अशोक अत्रम ,नामदेव महाराज गव्हाळे लक्ष्मणदास काळे महाराज ,सतीश तराळ ,भरत रेडे ,ज्ञानेश्वर निस्ताने, अरविंद काळमेघ,अजय सिंह चव्हाण, प्रमोद खर्चान ,यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते संचालन श्रीकृष्ण पखाले व मयूर वानखडे यांनी केले साहित्य संमेलनाचे उद्घाटन पहिल्या दिवशी भजन संध्या आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, तर विषयावर परिसंवाद नियोजन कार्यक्रम करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here