Home कोल्हापूर वडगावात शिवजयंती उत्साहात साजरी

वडगावात शिवजयंती उत्साहात साजरी

96
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_085812.jpg

वडगावात शिवजयंती उत्साहात साजरी

पेठवडगाव राहुल शिंदे : हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव मध्ये छत्रपती शिवजन्मोत्सव कमिटीच्या वतीने न भूतो न भविष्य अशी मिरवणूक करण्यात आली.संपूर्ण पेठ वडगाव शिवमय झाल्याचे दिसून आले.
आमदार सतेज पाटील यांचे आगमन होताच सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.तरुणाईंचा जल्लोष पाहून शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही.जणू काही दिवाळी साजरी होत असल्याचा वडगावच्या जनतेला असे वाटत होते. मिरवणुकीस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली.यामध्ये शिवकालीन युद्ध कला, पारंपारिक वाद्य, मर्दानी खेळ, आतषबाजी यांची भुरळ वडगांवच्या पाडली. यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विद्याताई पोळ, संदीप पाटील, राजवर्धन पाटील, गुरुप्रसाद यादव, अमोल हुक्केरी, जवाहर सलगर, अभिजीत गायकवाड, विजय अपराध, स्वप्निल शिंदे ,प्रतीक शिंदे, सुरज पाटील, अमोल भोसले,आतिष पाटील,प्रवीण माने,रोहित पाटील,अक्षय हाके,आदी उपस्थित होते.

Previous articleसेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप कंकाळ यांना २०२१ सालचा कृषीसेवारत्न पुरस्कार जाहीर
Next articleनितीनभाऊ दिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here