Home वाशिम सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप कंकाळ यांना २०२१ सालचा कृषीसेवारत्न पुरस्कार जाहीर

सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप कंकाळ यांना २०२१ सालचा कृषीसेवारत्न पुरस्कार जाहीर

50
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_085500.jpg

सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप कंकाळ यांना २०२१ सालचा कृषीसेवारत्न पुरस्कार जाहीर
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप कंकाळ यांना २०२१ सालचा पद्मश्री डॉ. विठ्ठराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कार -२०२१ नुकताच जाहिर झाला आहे.
कृषी विभागात अती उत्कृष्ट कार्य करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी कृषीसेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी २०२०,२०२१ व २०२२ ह्या तीनही वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून जून २०२३ रोजी सेवानिवृत्त झालेले कृषी अधिकारी दिलीप कंकाळ यांना राज्यस्तरावर आयुक्तालयातून अमरावती विभागातून २०२१ सालचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषीसेवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील २०१७-१८ साली तालुका बीज गुणन केंद्र वनोजा ता. रिसोड येथे दिलीप कंकाळ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असताना तीन हेक्टर क्षेत्रामध्ये शंभर क्विंटल तुरीचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल तत्कालीन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. जिल्हात शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सन २०१९-२० व २०-२१ कोरोना काळात संपूर्ण देश कुलुपबंद असताना कृषी विभाग चालू होता. वाशिम जिल्हा हा सोयाबीन पिकाचे हब म्हणून ओळखला जातो. शेतकर्‍यांचे संपूर्ण अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. परंतु या पिकांची हेक्टरी उत्पादकता फारच कमी झाली होती. याचा विचार करून सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांच्या मार्गदर्शनात पिकांची आष्टसूत्री तय्यार करून राबविली. अष्ठसूत्रीला तांत्रिक स्वरूप देऊन त्याद्वारे प्रत्येक गावागावात प्रचार प्रसार केला. त्याचा परिणाम म्हणून सोयाबिन पिकाची उत्पादकता प्रचंड वाढली. या त्यांच्या अती उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे

Previous articleवाघाच्या दातानं आणलं.. आ.गायकवाडांना अडचणीत
Next articleवडगावात शिवजयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here