Home कोकण गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. मीनल खांडके यांना पीएच. डी. पदवी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. मीनल खांडके यांना पीएच. डी. पदवी

81
0

राजेंद्र पाटील राऊत

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. मीनल खांडके यांना पीएच. डी. पदवी
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ३१ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात अकाउंटन्सी विषयाच्या प्रा. मीनल खांडके यांना नुकतीच पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. प्रा. मीनल खांडके यांनी गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात असलेल्या रिसर्च सेंटरअंतर्गत “ए स्टडी ऑफ फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ फिशरीज को-ऑपरेटिव्ह सोसायटीज इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट” या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला. महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य, अकाउंटन्सी विषयाचे विभागप्रमुख डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
प्रा. खांडके गोगटे – जोगळेकर महाविद्यालयामध्ये सहा वर्षापासून अध्यापनाचे काम करीत असून, त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘अविष्कार’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सहभाग घेऊन नैपुण्य प्राप्त केले आहे. याचबरोबरच मुंबई विद्यापीठाचा एक संशोधन प्रकल्पही त्यांना मंजूर झाला आहे. तसेच त्यांचे अनेक संशोधनपर लेख राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमधून प्रसिद्ध झाले असून, विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी शोधनिबंधांचे सादरीकरण आणि वाचन केले आहेत.
प्रा. खांडके यांच्या यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleकै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय (शेळगाव गौरी ) येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
Next articleसाखरीआगरमधील खलाशी बेपत्ता जयगडमधील मच्छिमार नौका नवेद २ चा शोध सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here