Home नांदेड देगलूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

देगलूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

125
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क

देगलूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बाबासाहेबांच्या पुर्णाक्रती भव्यदिव्य मुर्तीस पुष्पहार घालुन अभिवादन करतानां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नांदेड़ जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांतजी पदमवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देगलूर तालुका अध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, राष्ट्रवादी युवक कांग्रेस देगलूर -बिलोली विधानसभा अध्यक्ष शिवकुमार डाकोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर शहराध्यक्ष सुमित कांबळे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देगलूर शहर उपाध्यक्ष गजू कांबळे आदि जन उपस्थित होते.

तर येथीलच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील साकेत बुद्ध विहाराच्या नियोजित ठिकाणी या ठिकाणी च्या नगरसेविका कमलबाई धोंडीबा जी वानखेडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करूनभीम जयंती साजरा करण्यात आली यावेळी साकेत बुद्ध विहाराच्या अध्यक्ष समीक्षा अशोक कांबळे, उपाध्यक्ष संगीताबाई नागोराव वानखेडे, सचिव आम्रपाली भिमराव भाटापूरकर, कोषाध्यक्ष जनाबाइ वनंजे, सावित्राबाई सोनकांबळे, शोभाबाई माकणीकर, तर यावेळी भीमराव यादवराव भुताळे यांनी पंचशील त्रिशरण ग्रहण केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोवीड-कोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीची भीम जयंती सर्वांनी घरातच साजरा केली व नियोजित बुद्धविहाराचे ठिकाणी सर्व शासनाचे नियम पाळून भीम जयंती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आली.

येथील बुद्ध विहारा च्या ठिकाणी देगलूर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार विनोद गुंडमवार व देगलूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here