Home कोल्हापूर ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी- जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार.

ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी- जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार.

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0051.jpg

ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी- जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार.
पेठ वडगांव राहुल शिंदे:शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या निवेदनानुसार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी (आगमन) दिवशी सकाळी 6ते रात्री 12 वाजे पर्यंत आवाजाची विहित मर्यादा ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावत पारित केले आहेत.ध्वनिवर्धक ध्वनिक्षेपक वापरण्यास वापरण्याबाबत14 सुट्टीचे दिवस यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत.तसेच उर्वरित एक दिवस् यापूर्वी आवश्यकतेनुसार महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव सन 2022 मध्ये ध्वनी प्रदूषण( नियमन व नियंत्रण) नियम,2000 च्या नियम 5 (3) नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर शीतगृहे, सभागृह, सामूहिक सभाग्रह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरिज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी6 वाजल्या पासून रात्री12 पर्यंत जिल्ह्यामध्ये करता येईल.तथापि कोणत्याही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरामध्ये या आदेशानुसार कोणतीही सूट राहणार नाही.तसेच ध्वनिक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील.
जिल्ह्यासाठी ध्वनिवर्धक ध्वनिक्षेपक् वापरण्याबाबत घोषित करण्यात आलेल्या 14 सुट्टीच्या दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous article!खासदार अशोक भाऊ नेते यांची सांत्वन भेट!!
Next articleबोलठाण येथे वीज पडून 2महिला जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here