Home नाशिक बोलठाण येथे वीज पडून 2महिला जखमी

बोलठाण येथे वीज पडून 2महिला जखमी

142

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0056.jpg

बोलठाण येथे वीज पडून 2महिला जखमी
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दुपारी अडीच वाजता ढगांच्या गडगडाट जोरदार पावसाने हजेरी लावली रोहिला रस्त्या लगत संजय बारवकर यांच्या शेतात वीज पडल्याने 2 महिला जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदगाव येथे हलविण्यात आले.
पावसाने बऱ्याच दिवसांच्या विश्रांती दिल्यामुळे परिसरात पाऊसाची नितांत गरज भासू लागली होती.आज दिनांक 30 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेपासून परिसरात पावसाचे वातावरण निर्माण होऊन 2 ते 2:30च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली यात रोहिला रस्त्या लगत बोलठाण शिवारात येणाऱ्या संजय बारवकर यांच्या शेतात वीज पडली त्यात कल्पना संजय बारवकर,
ललीता प्रभाकर बारवकर या दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना नांदगाव येथुंन मालेगांवी उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Previous articleध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी- जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार.
Next articleमोर ला प्रनिमित्र,बडोदे यांनी दिले जीवदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.