Home परभणी जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीचा लाखांचा खर्च गेला खड्डयात

जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीचा लाखांचा खर्च गेला खड्डयात

147

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0004.jpg

जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीचा लाखांचा खर्च गेला खड्डयात

विष्णु डाखुरे (तालुका प्रतिनिधी )

जिंतूर: तालुक्यात वनविभाग, सामाजिक वनीकरणविभागासह अनेक कार्यालयांनी वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून वृक्षलागवड केली.परंतु गेल्या वर्षीचे बोटावर मोजण्याइतकेही वृक्ष जिवंत नसल्याने या लागवडीवर केलेला खर्च खड्डयात गेल्याचे चित्र आहे.
जिंतूर तालुक्यातील २०२०-२१ मध्ये सामाजिक वनीकरण व वनविभागामार्फत तसेच अनेक कार्यालयांमार्फत
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक कार्यालयाने खड्डे खोदून वृक्षलागवड केली. परंतू या वृक्षलागवडीकडे सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या वतीने वृक्ष जगविण्याच्या नावाखाली वृक्षलागवड नसलेल्या ठिकाणी उन्हात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावण् यात येत आहे. यावर्षी सुद्धा सामाजिक वनीकरण व वन विभागामार्फत वृक्ष लागवड होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू, मोठा गाजावाजा करत वृक्षलागवड करण्यात येते. त्या वृक्षांची काळजी मात्र कागदावरच घेतली जात असल्याचे समोर आले आहे. वृक्षलागवडीचे जिंतूर तालुक्यात नुसते खड्डे दिसत आहेत.

Previous articleआश्रय आशा फाउंडेशन द्वारे ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आरंभ..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची केली घोषणा
Next articleअजित दादा पवार चषक भोसरीच्या महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.