Home मुंबई आश्रय आशा फाउंडेशन द्वारे ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आरंभ..! पंतप्रधान नरेंद्र मोदी...

आश्रय आशा फाउंडेशन द्वारे ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आरंभ..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची केली घोषणा

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220722-WA0052.jpg

आश्रय आशा फाउंडेशन द्वारे ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आरंभ..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची केली घोषणा

मुंबई :(अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

भारत देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानात संपूर्ण देशवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील मोदी यांनी केले आहे. याच वेळी आश्रय आशा फाउंडेशन फाउंडेशन संस्थेने या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्याचे आणि प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
“आम्ही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढत असताना स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचे धैर्य आणि प्रयत्न आज आम्हाला आठवत आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्वजाचा पहिला फोटो ट्विट करत 22 जुलैच्या इतिहासाची थोडक्यात माहिती दिली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले. हा राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 रोजीच स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आजच्या 22 जुलैला आपल्या इतिहासात विशेष महत्त्व आहे, या दिवशी 1947 मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.आमची तिरंगा समिती आणि पंडित नेहरूंनी फडकवलेला पहिला तिरंगा याचा फोटो आणि दस्तावेज शेअर केले.

Previous articleमुखेड तालुक्यातील धनज येथील पुलाची दयनीय अवस्था.
Next articleजिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीचा लाखांचा खर्च गेला खड्डयात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here