Home Breaking News *देगलूर येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहाने साजरा*

*देगलूर येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहाने साजरा*

91
0

*देगलूर येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहाने साजरा* देगलूर,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- देगलूर येथे बलकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेलंगणा ,व कर्नाटक या दोन सीमेवर असलेल्या देगलूर शहरामध्ये बतकम्मा, व ग्रामीण भागामध्येही हा सण काल दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी खूप मोठ्या उत्साहाने व आनंदाने सर्व शहरी व ग्रामीण भागातील महिलांकडून साजरी करण्यात आला आहे. या सणाची प्रथा शेजारील तेलंगणा या राज्यात हा सण महिलासाठी सर्वात मोठा मानला जातो. त्याची प्रथा सीमेलगत असलेल्या आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा चालू आहे. बतकम्मा हा सण म्हणजे सर्व महिला आपल्या बतकम्मा घेऊन एका सार्वजनिक चौकामध्ये जमा होऊन ,गोल रिंगण करून त्यामध्ये सर्व बतकम्मा ठेवून गाणे म्हणून भुलाई खेळून एका नदीला जाऊन सर्व बतकम्मा पाण्यामध्ये विसर्जन करतात. अशी प्रथा परंपरागत चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here