Home नांदेड मुखेड तालुक्यातील धनज येथील पुलाची दयनीय अवस्था.

मुखेड तालुक्यातील धनज येथील पुलाची दयनीय अवस्था.

39
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220720-WA0010.jpg

मुखेड तालुक्यातील धनज येथील पुलाची दयनीय अवस्था.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड
मुखेड- परीसरातील धनज ता. मुखेड येथील पुलाचे काम पूर्ण करून एक वर्षे ही पूर्ण झाले नाही.संबंधित गुत्तेदाराने पुलाचे काम निक्रष्ट दर्जाचे करत अर्धवट सोडून दिले.त्यामुळे मागील आठ ते दहा दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता धनज गावासाठी ये जा करण्यासाठी मुख्य रस्ता आहे.पुलाचे काम अर्धवट झाल्यामुळे पाऊस पडला की गावचा संपर्क तुटतो.शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना पुलावरून मार्ग काढून जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी धनज गावाची होणारी अडचण लक्षात घेऊन अर्धवट झालेल्या पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे मुखेड तालुका प्रसिद्धी प्रमुख बळवंत पाटील बोडके धनजकर यांच्यासह गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Previous articleटोप मधील युवकाने उद्धव ठाकरेंना लिहले रक्ताने पत्र.
Next articleआश्रय आशा फाउंडेशन द्वारे ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आरंभ..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची केली घोषणा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here