Home अमरावती कोंडण्यापूरच्या दरोड्यातील ट्रक चालकाला शस्त्र आणि मारहाण करून ९२ हजार रुपये  रोख...

कोंडण्यापूरच्या दरोड्यातील ट्रक चालकाला शस्त्र आणि मारहाण करून ९२ हजार रुपये  रोख लांबविणाऱ्या चार आरोपीला अटक, दोघे फरार.

41
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_175857.jpg

कोंडण्यापूरच्या दरोड्यातील ट्रक चालकाला शस्त्र आणि मारहाण करून ९२ हजार रुपये  रोख लांबविणाऱ्या चार आरोपीला अटक, दोघे फरार.
—-_——-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (कौंडण्यपूर)
ट्रक समोर दोन दुचाकी आडव्या करून ट्रक चालकाला शास्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ९२ हजार रुपये रोख लांब देण्यात आली फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ते७.३०च्या सुमारास कोंडण्यपूर नजीक दरोड्याची ती घटना घडली होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कुऱ्हा पोलिसांनी उद्या सहा तासात त्या गंभीर घटनेचा उलगडा केला. अटक आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. चांदुर रेल्वे येथील प्रमोद भोयर (४२)हे एम एच २७ बीएक्स९५६० या ट्रकने आर्वी येथून ढेप घेऊन चांदुर रेल्वे कडे येत असताना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कौंडण्यपूर जवळ त्यांच्या वाहनाच्या मागील बाजूने दोन दुचाकी तीन ते चार ईसम आले. त्यांनी शिवीगाळ करून ट्रक थांबविण्यास सांगितला. परंतु भोयर यांनी ट्रक न थांबता पुढे नेला असता आरोपी पैकी एकाने त्यांची दुचाकी पुढे नेऊन ट्रक समोर आडवी केली. त्यामुळे भोयर यांना आपले वाहन थांबवावे लागले. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी ट्रकच्या केबिनमध्ये शिरत भोयर यांना लाथा बुक्क्यांनी वर धारदार शस्त्राने मारहाणसुरू केली. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्या खिशातील रोख ९२ हजार रुपये जबरीने हिसकावले. तथा आरोपी दुचाकीने पळून गेले. घटनेचे अनुषंगाने कुरा येथे जबरी चोरी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत यांनी मार्गदर्शन करून तपासासाठी कुह्रा ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे चार पदके नेमली येथे ज्या ठिकाणी घेऊन ट्रक भरली त्या ठिकाणी सहमार्गावरील सीसीटीव्हीची फुटेज ची पाहणी केली. मजुरांची कसून विचारपूस केली. त्यावेळी पोलिसांना मजुरापैकी नितेश उद्धवराव पुरी वय २५ वर्धा मनेरी ता. आर्वी यांच्यावर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले तशी आरोपी नितेशने कबुली दिली. साथीदार करण मूगबेलसिंग बावरी वय २६, सुरज पद्माकर थुल वय २१, गोपाल किसनराव दखणे वय २३, विकास मुंद्रे , सुरज गडलींग(सर्व रा. आनंदवाडी ता. तिवसा.) यांच्या मदतीने तो गुन्हा केल्याची कबुली नितेश पुरी यांनी दिली. कबोली नुसार नितेश पुरीसह करण, सुरज व गोपालला अटक करण्यात आली. तर विकास मुंद्रे व सुरत गडलींग हे दोघे फरारआहेत. एसीपी वैशाली आनंद, ए एस पी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पुण्याचे ठाणेदार अनुप वाकडे, सहाय्यक निरीक्षक सचिन पवार, उपनिरीक्षक संजय शिंदे, कुरा येथील अंमलदार अनिल निघोट, हेमंत डहाके ,सागर निमकर, पण मोहोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous articleग्रंथ दिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात.
Next articleसोलापूर जिल्ह्यात काल असंख्य जनतेने अजितदादा पवार गटात केला पक्ष प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here