• Home
  • भारतीय बेरोजगार; मात्र इथल्या कंपन्यांनी अमेरिकेत दिल्या १.२५ लाख नोकऱ्या!

भारतीय बेरोजगार; मात्र इथल्या कंपन्यांनी अमेरिकेत दिल्या १.२५ लाख नोकऱ्या!

🛑 भारतीय बेरोजगार; मात्र इथल्या कंपन्यांनी अमेरिकेत दिल्या १.२५ लाख नोकऱ्या! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 17 जून : ⭕ भारतातील १५५ कंपन्यांनी अमेरिकेत २ हजार २०० कोटी डॉलर्सची अमेरिकेत भारतीय कंपन्यांची गुंतवणूक केली आहे. यासह, १ लाख २५ हजार लोकांना तिथे रोजगार मिळाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सीआयआयच्या ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल २०२०’ च्या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेतील वॉशिंग्टन, डीसी आणि प्यूर्टो रिको यासह एकूण ५० राज्यात भारतीय कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे, यामुळे मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

या ठिकाणी दिल्या नोकरीच्या संधी!

टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा येथे सर्वाधिक काम करणारे कामगार भारतीय कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सिनेट इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष आणि सिनेटचा सदस्य जॉन कॉर्नीन म्हणाले, “भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांनी आपल्या देशात संस्कृती, अर्थव्यवस्था आणि विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

तसेच टेक्सास आपल्या परिश्रम आणि नावीन्याचा सन्मान करत असल्याचे ही त्यांनी सांगितले. म्हणूनच चांगले काम करत रहा. सीआयआयने म्हटले आहे की, या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या भारतीय कंपन्यांचा टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि मॅसेच्युसेट्समध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक देखील आहे.

एफडीआय मिळविणाऱ्या देशांमध्ये हे नवव्या स्थानावर

२०१९ साली भारतामध्ये ५१ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे, वर्षभरात सर्वाधिक एफडीआय मिळविणाऱ्या देशांमध्ये हे नवव्या स्थानावर आहे. युनायटेड नेशन्सच्या बिझिनेस युनिटच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कोविड -१९ नंतर भारत कमकुवत असला तरू पण सकारात्मक आर्थिक वाढ साध्य करणार, असे संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद (यूएनसीटीएडी) यांनी सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच भारताची ही व्यापक बाजारपेठ देशासाठी गुंतवणूक करण्यात नक्कीच आकर्षित करेल.⭕

anews Banner

Leave A Comment