Home सोलापूर सोलापूर जिल्ह्यात काल असंख्य जनतेने अजितदादा पवार गटात केला पक्ष प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात काल असंख्य जनतेने अजितदादा पवार गटात केला पक्ष प्रवेश

106

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_180252.jpg

सविता तावरे- मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर
सोलापूर जिल्ह्यात काल असंख्य जनतेने अजितदादा पवार गटात केला पक्ष प्रवेश
काल 3 फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राष्ट्रपती भवन उद्घाटन आणि कार्यकर्ता संवाद साठी गेले असता सोलापूर मधील असंख्य जनतेने अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यामध्ये बिजू प्रधाने सह, माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर या प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मागील वर्षीच बिजू प्रधाने सह इतर मान्यवरांनी भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्ष सोडून महेश कोठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता हे प्रवेश म्हणजे माजी महापौर महेश कोठे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. काल जुनी मिल कंपाउंडच्या मैदानावर झालेल्या शहराच्या मेळ्यात त्यांनी अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संजय मामा शिंदे, किसन जाधव मुख्य प्रवेश प्रवक्ते, उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच काल त्यांनी भव्य रॅली काढून आपला राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीर केला आणि आपले विचार घराघरात पोचविण्याची ग्वाही दिली.

Previous articleकोंडण्यापूरच्या दरोड्यातील ट्रक चालकाला शस्त्र आणि मारहाण करून ९२ हजार रुपये  रोख लांबविणाऱ्या चार आरोपीला अटक, दोघे फरार.
Next articleविषय- जाहिराती चांगल्या की वाईट **************************
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.