• Home
  • 🛑 GST च्या दरात घसघसीत घट, ‘या’ जीवनाश्यक वस्तू होणार स्वस्त 🛑

🛑 GST च्या दरात घसघसीत घट, ‘या’ जीवनाश्यक वस्तू होणार स्वस्त 🛑

🛑 GST च्या दरात घसघसीत घट, ‘या’ जीवनाश्यक वस्तू होणार स्वस्त 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 25 ऑगस्ट : ⭕ मोदी सरकारने करदात्यांसाठी आज दिलासादायक बातमीची घोषणा केली आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपये आहे त्यांना जीएसटी मधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा याआधी 20 लाख रुपये इतकी होती. या व्यतिरिक्त ज्या व्यवसायिकांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रुपयांपर्यंत आहे ते कम्पोजिशन स्कीम निवडू शकतात. गृहपयोगी असलेल्या तेल, टूथपेस्ट, आणि साबणावरील कर कमी करण्यात आला आहे.

दरम्यान, जीएसटी लागू झाल्यापासून बहुतेक वस्तूंवरील कराचा दर कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर 28 टक्के करांच्या खाली लक्झरी वस्तू व नाशवंत वस्तू आहेत. या टॅक्स स्लॅब अंतर्गत 230 वस्तू होत्या, मात्र 200 वस्तू कमी टॅक्स स्लॅबमध्ये घेण्यात आल्या असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

या वस्तूंवर देखील जीएसटी असणार कमी
जीएसटीच्या अंमलबजावणीच्या वेळी, करांची संख्या सुमारे 65 लाख होती, जी आता वाढून 1.24 कोटी झाली आहे. आता जीएसटीशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित झाली आहे. याशिवाय सरकारनं सिनेमा तिकिटावरील टॅक्सही कमी केली आहे. याआधी 35 % ते 110 % टॅक्स स्लॅबमध्ये असलेले तिकिटांचे दर आता 12 % आणि 18 % वर आले आहे. याशिवाय हेअर ऑइल, टूथपेस्ट, साबण यांच्यावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.

निवासी क्षेत्रालाही दिलासा बांधकाम क्षेत्र आणि विशेषत: निवासी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आता ते पाच टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबखाली ठेवले आहे. स्वस्त घरांवरील जीएसटी दर आता एक टक्का करण्यात आला आहे. अशी माहिती मंत्रालयाने ट्विट करून सांगितली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment