• Home
  • 🛑 Unlock 4.0 Guidelines; सप्टेंबरपासून ‘या’ गोष्टी होणार सुरु ? 🛑

🛑 Unlock 4.0 Guidelines; सप्टेंबरपासून ‘या’ गोष्टी होणार सुरु ? 🛑

🛑 Unlock 4.0 Guidelines; सप्टेंबरपासून ‘या’ गोष्टी होणार सुरु ? 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 25 ऑगस्ट : ⭕ देशात कोरोना माहामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र आर्थिक व रोजगारासारखे प्रश्न भेडसावत असल्याने पुन्हा देश अनलॉक करावा लागला. त्यानुसार अनलॉक प्रक्रीयेद्वारे विविध विविध सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या. आता पुन्हा अनलॉक 4.0 प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अनलॉक 4.0 मध्ये कोणकोणत्या शिथिलता देण्यात येणार आहे ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केंद्र सरकार 1 सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची घोषणा केली.

त्याचबरोबर मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पण अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील बंद असलेल्या शाळा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. पण केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment