• Home
  • 🛑 राज्यात परतणार्‍या बिहार्‍या‍ंची संख्या पाहून बिहार नेत्यांना ….! रोहित पवारांनी सुनावले 🛑

🛑 राज्यात परतणार्‍या बिहार्‍या‍ंची संख्या पाहून बिहार नेत्यांना ….! रोहित पवारांनी सुनावले 🛑

🛑 राज्यात परतणार्‍या बिहार्‍या‍ंची संख्या पाहून बिहार नेत्यांना ….! रोहित पवारांनी सुनावले 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई -⭕ देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटकाळात खबरदारीचा उपाय देशात लागू केलेला लॉकडाऊन आता टप्प्या टप्प्यात उठवण्यात येत असल्यामुळे कोरोनाकाळात आपआपल्या घरी परतलेले परराज्यातील मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतू लागले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच पार्श्वभूमीवर बिहारमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमधून रोहित यांनी बिहारमधील नेत्यांमध्ये तेथील तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याची ताकद नसल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यावे लागत असल्याचे म्हटले आहे.

इतरच नाही तर बिहारमधील नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यात जी शक्ती खर्च केली विकासावर केली असती तर चित्र वेगळे असते, असेही रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याशिवाय बिहारमधील राजकारणामुळेच आज जनता आहे, त्या ठिकाणीच राहिल्याचा टोलाही रोहित यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे…🛑

anews Banner

Leave A Comment